कल्याणमध्य़े राडा,तलवारीने वार, 25 जणांविरोधात गुन्हा दाखल

कल्याणमध्य़े राडा,तलवारीने वार, 25 जणांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण राजकीय वादात न पडण्याच्या कराणवारून मित्राने मित्राच्या कुटुंबावर आणि मित्रावर 25 जणाच्या मदतने हल्ला केल्याची घटना कल्याणमधील खडकपाडा येथे घडला. य़ाप्रकऱणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी चिंतामणी निळजेकर याच्यासह त्याचा मुलगा व इतर 25 जणाच्या विरोधात जणांवर प्राणघातक हत्यारांनी हल्ला करणे आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिस तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी एका राजकीय व्यक्तीला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता.या प्रकरणी संबंधित पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक डिसीपी कार्यालय येथे रात्री उशिरा पर्यँत जमा होते .दरम्यान यातील चिंतामण निळजेकर याने फिर्यादी एकनाथ म्हात्रे यांना तू कल्याण पश्चिमेच्या कोणत्याही राजकीय वादात कोणाच्याही बाजूने उभे राहायचे नाही असा सल्ला दिला मात्र म्हात्रे याने यावर आपण ही कोणाच्या बाजूने उभे राहणार नाही तू पण नको राहुस असे सांगितले.त्यामुळे रागावून थोड्या वेळाने चिंतामण निळजेकर याने म्हात्रेला फोन करून मी तुला मारायला येत आहे तयारीत राहा असे बोलून आपल्या साथीदारांसह येऊन एकनाथ म्हात्रे वर हल्ला केला मात्र तलवारीचा वार म्हात्रे ने चुकवला यावेळी मध्यस्थीसाठी आलेल्या म्हात्रे याचा नातेवाईक किसन भोईर याच्या डोक्यावर वार करण्यात आला तर इतर लोकांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली.अशी फिर्याद एकनाथ म्हात्रे याने बाजारपेठ पोलीस स्टेशनला रात्री उशिरा दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.


Next Story
Share it
Top
To Top