पद्मावत पाहण्यास गेलेल्या तरुणीवर बलात्कार

पद्मावत पाहण्यास गेलेल्या तरुणीवर बलात्कार

हैदराबाद | आयटी हब आणि महिलांसाठी सर्वात सुरक्षित असलेल्या हैदराबाद शहरात पद्मवात चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणीवर थिएटरमध्येच बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी एका नराधमास अटक करण्यात आले आहे. सोशल मीडियाद्वारे मैत्री झाल्यानंतर तरुणी त्या मित्रासोबत चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. त्या मित्रानेच तिच्यावर थिएटरमध्ये बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. चित्रपट सुरू असताना थिएटरमध्ये कमी लोक असल्याचा फायदा घेत त्या मित्राने बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित तरुणाला अटक करण्यात आले आहे.


Next Story
Share it
Top
To Top