अंशी वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार

अंशी वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार

पुणे: पिंपरी-चिंचवड येथील रुपीनगर परिसरातील झोपडपट्टीत राहणा-या एका ८० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला घरात एकटी होती याचा फायदा घेऊन आरोपीने हे कृत्य केले. पीडित महिला तिच्या ४९ वर्षीय मुलासह रुपीनगरमध्ये राहते. १३ जानेवारीला मुलगा घराबाहेर गेले असताना आरोपीने घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला व बळजबरीने बलात्कार केला. मुलगा घरी परतल्यानंतर तिने सर्व घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी लगेच देहूरोड पोलीस ठाणे गाठले व अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला. या महिलेच्या वैद्यकीय तपासणीमधून तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


Next Story
Share it
Top
To Top