रेतीची तस्करी करणा-या १३ ट्रकसह २ कोटी ५.५ लाखाचा मुद्देमाल जप्त

[embed]https://youtu.be/OFekvpfuVe4[/embed]
उत्तम बाबळे
नांदेड :-पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने आज पर्यंत मारलेल्या छाप्याच्या नोंदीनूसार १७ जून रोजी केलेली रेती तस्करांविरुद्धची ही दुसरी कारवाई सर्वात मोठी असून बनावट पावतीच्या आधारे शासनाचा महसूल बुडऊन रेतीची तस्करी करणारे १३ ट्रक ६५ ब्रास रेतीसह लोहा तालुक्यात पकडले आहेत.यात २ कोटी ५ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून लोहा पोलीसांनी ट्रक चालकआणि मालकसह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धाडसी कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणानले आहे.विशेष पोलीस पथकाचे प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर, आणि त्यांच्या पथकातील सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर, जगताप,खंदारे,कुलकर्णी,पायनापल्ले, निरणे,जिंकलवाड,गंगुलवार, आवातिरक आणि चालक देवकत्ते हे सर्व जण १७ जून २०१७ रोजी नांदेड - लोहा रस्त्यावर गस्तीवर असतांना त्यांना गोपनिय माहिती मिळाली होती. जिल्ह्यातील नद्यांच्या रेती घाटावरुन जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात याच मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैद्यरित्या रेतीची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस पथकाने पाळत ठेवली असता दुपारच्या दरम्यान लोहा रस्त्याने एकामागे एक असे १३ ट्रक रेती भरुन घेऊन येतांना दिसले. पोलिसांनी ट्रक अडऊन चाैकशी केली असता.त्या ट्रक चालकांकडे खाडाखोड केलेल्या शिक्के मारलेल्या पावत्या मिळाल्या.या पावत्यांच्या क्रमांकाची चाैकशी पुणे गाैण खणीज विभाग कार्यालयाकडे केली असता.त्यावरील शिक्के असलेल्या रेती ठेकेदाराची नोंद त्यांच्याकडे आढळली नाहीत व महसूल खात्याकडे नोंद पाठविणा-या एस.एम.एस.चा बारकोड देखील जुळून आला नसल्याचे पुणे गाैण खणीज विभागाने कळविले.यावरुन असे निदर्शनास आले की बनावट पावत्यांचा वापर करुन शासनाची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणात अवैद्यरित्या रेतीची तस्करी केली जात आहे.यामुळे पथकाने रेतीने भरलेले ते १३ ट्रक रेतीसह ताब्यात घेतले.तसेच रेती व ट्रक असा एकूण २ कोटी ५ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या पथक प्रमुखांनी फिर्याद दिल्यावरुन नांदेड,लातुर व बीड या तीन जिल्ह्यातील त्या ट्रकच्या चालक व मालक अशा २५ जणा विरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३७९, ३३६ आणि ३४ भादवि प्रमाणे लोहा जि.नांदेड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next Story