जळगावात ट्रकवर दगडफेक

जळगावात ट्रकवर दगडफेक

जळगाव - अज्ञात हल्लेखोरांनी वाहनांवर जोरदारदगडफेक केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शहरातील तांबापुरा भागात घडली. यात जैन इरिगेशन कंपनीच्या ट्रक आणि पिकअप वाहनाचे नुकसान झाले आहे.

शिरसोली नाक्याजवळील गल्लीतून ही दगडफेक झाल्याचे वाहनचालकांनी सांगितले. यात ट्रकची समोरची काच फुटली, तर पीकअप गाडीचेही नुकसान झाले आहे. घटनास्थळी जैन इरिगेशनचे सुरक्षारक्षक दाखल झाले होते. त्यांनी वर्दी दिल्यावर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


Next Story
Share it
Top
To Top