पत्नीच्या हत्येच्या आरोपातून शोएबची निर्दोष मुक्तता

पत्नीच्या हत्येच्या आरोपातून शोएबची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली । 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' या शोचा फेम शोएब इलियासीची पत्नीच्या हत्येच्या आरोपातून आज दिल्ली कोर्टाने निर्दोष अशी मुक्तता केली. पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्याखाली शोएबला अटक करण्यात आली. १७ वर्षांनंतर दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने शोएबला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आज (५ ऑक्टोबर) शोएबची दिल्ली हायकोर्टने निर्दोष मुक्तता केली. इंडियाज मोस्ट वॉन्टेड या शो ने ९०चा काळ गाजवला होता. अनेक गुन्हेगारांनीहि या शो ची दखल घेतली होती. ९०च्या काळात या शोमुळे शोएबलासुद्धा प्रसिद्धी मिळाली होती. अंजुच्या मृत्यूनंतर शोएबने सौम्या खान हिच्याशी लग्न केले त्यांना एक मुलगा आहे.

शोएबच्या जीवनावर आढावा

शोएबचा जन्म दिल्लीमध्ये झाला असून त्याचे वडील पिता जमील इलियासी ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख होते. शोएबने जामिया मिल्लिया इस्लामियामधून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. तिथेच अंजुची आणि शोएबची ओळख झाली. शिक्षणानंतर अंजू व शोएब दोघेजण लंडन ला गेले. टीव्ही एशियामध्ये त्यांनी एकत्र काम केले. शोएब तिथे प्रोड्युसर म्हणून काम करत होता.भारतात परत आल्यावर त्यांनी इंडियाज मोस्ट वॉन्टेड या शोमध्ये त्याने अँकरचे काम केले. हा शो फरार अपराध्यांवर आधारित होता. या शो मध्ये क्राईमचे चित्रीकरण केले. त्यामुळे पोलिसांची मदत घेऊन संपूर्ण माहिती मिळवायचे.

या शो नंतर त्यांनी ४९८ए या नावाने चित्रपट तयार केला असून चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला. ११ जानेवारी २००० रोजी सकाळी शोएबच्या पत्नीची हत्या करण्यात आली. आणि हत्या करताना कात्रीचा वापर केल्याचा पुरावा सापडला. २८ मार्च २००० रोजी शोएबला अटक करण्यात आले. शोएब अंजूकडे वारंवार हुंड्याची मागणी करत असायचा व त्यामुळे त्यांच्यात दर रोज भांडण होत राहायचे, असा आरोप अंजुच्या कुटुंबीयांनी लावला. व त्यांनतर शोएबने लगेच सौम्या खानशी लग्न केले त्यांना एक मुलगा आहे.


Next Story
Share it
Top
To Top