मुंबईत अंमली पद्धर्थ विरोधी पथकाची एकाच वेळी दोन ठिकाणी कारवाई

मुंबईत अंमली पद्धर्थ विरोधी पथकाची एकाच वेळी दोन ठिकाणी कारवाई

मुंबई | मुंबईत अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या ३ लोकांना मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी आणि बांद्रा युनिटने अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरळी व बांद्रा युनिटने एकाच वेळी दोन ठिकाणी अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करत ३ किलो १६० ग्रॅम वजनाचा MD (मेफेड्रॉन) जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या MD ची किंमत ४ कोटी ७४ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

वरळी युनिटची कारवाई


वरळी युनिटला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल, २८ मार्चला माता रमाबाई आंबेडकर मैदान, घाटकोपर, मानखुर्द लिंक रोड, शिवाजीनगर, गोवंडी या ठिकाणी सापळा रचला होता. या वेळी शामसुल्लाह ओबेदुल्ला खान, वय 39 वर्शे, रा. वैषाली नगर, जागेष्वरी (प), मुंबई हा अंमली पदार्थ त्याच्या गिराईकांना विक्री करण्याकरीता आला असता वरळी युनिने त्याला पकडून त्याच्याकडून एकूण ३७ लाख ५० हजार इतक्या किंमतीचा 250 ग्रॅम MD (मेफेड्रॉन) जप्त केला. त्याची विचारपूस केली असता त्याने आयुब इझहार अहमद शेख या व्यक्तीकडून खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी मग या इसमाचा शोध घेऊन, त्याच्या घराची झडती घेतल्यावर ४ कोटी १४ लाखांचा 2 किलो 760 ग्रॅम MD (मेफेड्रॉन) जप्त केला. अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन इसमांकडून एकूण ३ किलो १० ग्रॅम वजनाचा, ४ कोटी ५१ लाख ५० हजार रुपयांचा MD जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरोधात NDPS Act नुसार गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

बांद्रा युनिटची कारवाई


अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने MD (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाचा मुंबईत पुरवठा करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एकूण २२ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या १५० ग्रॅम MD (मेफेड्रॉन) सह अटक केली. बांद्रा पूर्वच्या बेहरामपाडा परिसरात गस्त करीत असताना खेरवाडी उदंचन केंद्राच्या गेटच्या बाजुला, सर्व्हीस रोड येथे एक संशयास्पद इसम दिसून आला. त्याची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता त्याच्या ताब्यात एकूण १५० ग्रॅम वजनाचा MD (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर NDPS Act नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अटक केलेला आरोपी हा मागील काही वर्षांपासून मुंबई शहर व उपनगरात MD विक्रीचा व्यवसाय करत असून त्याच्यावर वेगवेगळया पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून शहरात अंमली पदार्थाच्या तस्करीत वाढ झालेली आहे. तरुणांना नशेची लथ लावून त्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळते आहे. या पूर्वी आझाद मैदान युनिटने २५ मार्चला डोंगरी परिसरातून ३ किलो ११० ग्रॅम वजनाचा ४,६६,५०,००० रुपयांचा MD जप्त केला होता. आता या तसकऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या अंमली पद्धर्थ विरोधी पथकांनी विशेष मोहीम सुरू करत युद्ध छेडल्याचे दिसत आहे.Next Story
Share it
Top
To Top