महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

परभणी । महिलेच्या सतत शारीरिक सुखाच्या मागणीला कंटाळून परभणीमध्ये एका तरूणाने गळफास लावून (१४ ऑक्टोबर रोजी) आत्महत्या केली आहे. ही महिला त्या तरुणाकडून वारंवार शरीरसुखाची मागणी करीत होती. त्यामुळे या तरुणाने आत्महत्या केली असे, सुसाईट नोटमध्ये लिहिले होते. पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

परभणीमधील वसमत या रोडवर असलेल्या ब्रम्हा अपार्टमेंटमधील राहत्या घरी तरुणाने आत्महत्या केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.तरुणाने त्याच्या सुसाईट नोटमध्ये एका महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. महिलेने चार- पाच दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळेच मी आत्महत्या करता आहे,असे सुसाईट नोटमध्ये लिहले होते.माझ्या मृत्यूनंतर माझ्या मित्रांना त्रास देऊ नये,असे हि त्यात लिहण्यात आले आहे.


Next Story
Share it
Top
To Top