औरंगाबाद- उत्तरप्रदेशातून औरंगाबादेत सरपंच सोबत आलेल्या पोलिस कर्मचा-याला इलाहाबाद पोलिस अधिक्षकांनी निलंबित केले आहे.
इलाहाबाद जिल्ह्यातील सोराॅव तालुक्यातील सरपंच इम्तीयाज समी अहमद यांच्या सोबत त्यांचा शस्रधारी अंगरक्षक आरिफ मो.हसन अहमद रा.धामपुर ता.जखनिया हा इलाहाबाद पोलिस मुख्यालयातीलस कर्मचारी आहे या कर्मचारीला आहे. सरपंच इम्तीयाज समी अहमद यांच्या कुटुंबियाची हत्या एका सामुहिक हत्याकांडात झाली होती.त्यामुळे सरपंच अहमद यांना इलाहाबाद पोलिसांनी पोलिस संरक्षण दिले आहे. म्हणून पोलिस कर्मचारी आरिफ अहमद याची पोलिस मुख्यालयाकडून सरपंच यांच्या अंगरक्षक म्हणून नियुक्ती केली होती.पण आपली हद्द सोडून जाताना मुख्यालयाला कळवावे लागते हा नियम आरिफ मोहमदला माहित नव्हता.कारण तो आठच महिन्यांपूर्वी पोलिस दलात ट्रेनिंग संपवून रुजू झाला होता.शनिवारी दुपारी पोलिस कर्मचारी आरिफ मोहमंद हा स्टेनगन घेऊन इज्तेमाच्या ठिकाणी फिरतांना वाळूज पोलिसांना आढळला.पोलिस निरीक्षक सतीष टाक यांनी आरिफला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. व इलाहाबाद मुख्यालयाशी संपर्क साधून आरिफ विषयी अधिक माहिती जाणून घेतली.त्या माहितीत आरिफ याने वरिष्ठ अधिकार्यांना न सांगता औरंगाबाद गाठले होते.हा हलगर्जीपणा ज्यावेळेस इलाहाबाद अधिक्षकांना कळाला तेंव्हा त्याचे तात्काळ निलंबन केल्याची माहिती उत्तरप्रदेश पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांना दिली.त्याची स्टेनगन जप्त करण्यात आली असून सरपंच इम्तीयाज अहमद सहित पोलिस कर्मचारी आरिफ इलाहाबाद पोलिसांकडे रवाना केले. दरम्यान रविवारी इज्तेमातील स्वयंसेवकांनी चौघांना चोरटे असल्याच्या संशयावरुन मारहाण करत डांबुन ठेवले व वाळूज पोलिसांना माहिती दिली.चौघांपैकी एकाला स्वयंसेवकांच्या मारहाणीत जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसआयुक्तालयातील वरिष्ठ सुत्रांनी दिली.या प्रकरणात मयताची ओळख अद्यापही पटली नाही.त्याचा मृृ तदेह घाटी रुग्णालयाच्या शवागृृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले तर उरर्वित तिघे मुबारक हसन तिंबोळी(३४) रा.जोगेश्वरी मुंबई, अन्वरखान इमामखान (३९) भवानीपेठ पुणे,शे.अकील उर्फ सालणरोटी(१८) रा.मालेगाव औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात आहेत.