लष्कराच्या रेल्वेगाडीतून अश्रुधूराच्या नळकांड्या चोरीला!

झाशी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील एका लिपिकावर पाकिस्तानातील हेरांना माहिती पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर काही दिवसांतच झाशीतच आणखी एक संवेदनशील आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लष्करी जवानांना घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीतून स्मोक बॉम्बचे खोके चोरीला गेले आहेत.

महाराष्ट्रातील पुलगावहून पंजाबमधील पठाणकोटकडे निघालेली ही विशेष गाडी रविवारी झाशी रेल्वे स्थानकाबाहेर थांबली असताना, एका डब्याचे सील तुटले असून त्यातील स्मोक बॉम्ब ठेवलेले खोके गायब असल्याचे लष्कराच्या जवानांना आढळले.

याप्रकरणी शासकीय रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) तक्रार नोंदवण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

मध्यप्रदेशातील बिना ते झाशी रेल्वे स्थानकादरम्यानचे अंतर पार करताना ही गाडी बऱ्याच ठिकाणी थांबली होती, याचदरम्यान चोरट्यांनी डाव साधल्याचा अंदाज आहे.


Next Story
Share it
Top
To Top