बंगळूरू - बनावट स्टँम्प पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगी अत्यवस्थ असून त्याला बगळुरू मधील व्हिक्टोरीया रूग्णालयात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. ४ दिवसापूर्वी तेलगीला मेंदूज्वराचा त्रास होवू लागल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. मात्र त्याची प्रकृती स्थिर असलयाचे हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तेलगीचे वकील एमटी नानैया मात्र तेलगीची स्थिती गंभिर असून तो अत्यवस्थ असल्याचे म्हटले आहे. तेलगीला रूग्णालयात दाखल करण्यासाठी वेळ लावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तेलगीला स्टँम्प पेपर घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले असून त्याला ३० वर्षाची शिक्षा आणि २०२ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या तो बंगळूरूच्या कारागृहात शिक्षा भोगत होता. २००१ साली त्याला अजमेर येथून अटक करण्यात आली होती.