मुंबई 1993 साखळी बॉम्बस्फोटप्रकरणातील सहा आरोपींना कोणती शिक्षा ठोठवण्यात यावी यावर सीबीआयने गुरूवारी युक्तवाद केली आहे. या युनक्तिवादात सीबीआयने दोषीवंर कठोर शिक्षेची मागणी विशेष टाडा न्यायालयाकडे केली आहे..
टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा, फिरोज खान, करीमुल्ला खान, रियाझ सिद्दिकी आणि ताहीर मर्चंट यांना दोषी ठरवले. या पाच जणांना कोणती शिक्षा ठोठावण्यात यावी, याबाबत विशेष सीबीआय वकील दीपक साळवी यांनी युक्तिवादास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाने अशा केसेसमध्ये फाशीची शिक्षा ठोठावल्याच्या अनेक प्रकरणांचा हवाला साळवी यांनी विशेष न्यायालयाला दिला.