हत्या करून पत्नीला घरातच पुरले

हत्या करून पत्नीला घरातच पुरले

सोलापूर – येथील एका पतीने क्रुरतेचा कळस गाठला. अनैतिक संबंधांच्या आड येत असल्याने त्याने प्रेयसीच्या मदतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह घरातच पुरला. येथील वळसंग भागात घडलेला हा थरारक प्रकार आजच उघडकीस आला आहे.

१२ ऑगस्ट रोजी दुपारी पती व प्रेयसीने गळा दाबून पत्नीची हत्या केली आणि संशय येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात महिला हरविल्याची तक्रार दाखल केली होती.मात्र एका पोलीस मित्राला याची कुणकुण लागल्यामुळे या प्रकाराला वाचा फुटली.दरम्यान, याप्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची तसेच मृतदेह घरातच खड्डा खोदून पुरल्याची कबुली दिली. त्याची प्रेयसी अजूनही फरार असून तिचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून पोलिसांनी अद्याप आरोपींची नावे उघड केलेली नाहीत.


Next Story
Share it
Top
To Top