उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारू भट्टीवर छापा, 16 जणांवर गुन्हा दाखल

उत्तम बाबळे

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जिल्हा पोलीस दलाच्या विविध विभागामार्फत अवैध देशी विदेशी दारु विक्रीवर आळा घालण्यासाठी प्रतिदिन छापे मारुन लाखो रुपयाची अवैध दारु जप्त केली व अनेकांना जेरबंद करुन गुन्हे दाखल केले.या मोहिमेची दखल घेऊन जिल्हाधीकारी अरुण डोंगरे यांनी उत्पादन शुल्क विभाग नांदेडच्या अधिका-यांना अवैध दारु विक्रीवर आळा घालण्याचे आदेश दिल्यावरुन उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हदगाव,भोकर,मुदखेड,मुखेड व देगलूर तालुक्यात धाडी मारल्या.या कारवाईत २४ लीटर अवैध देशी दारु,२३० लीटर हातभट्टी दारु व २ हजार ४६० लीटर दारु बनविण्याचे रसायन जप्त केले असून १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील देशी विदेशी दारुचे दुकाने बंद झाली तेंहा पासून जिल्ह्यात अवैधरित्या देशी विदेशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.या अवैध विक्रीवर व विक्रेत्यांवर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेले विशेष पोलीस पथक,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस,पोलीस ठाणे सेवारत पोलीसांकडून प्रतीदिन छापे टाकली जात असून आता पर्यंत लाखो रुपयाची अवैध देशी विदेशी दारु जप्त करण्यात आली व अनेकांनाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.दारु बंदी काळात अवैध दारु मोठ्या प्रमाणात सहज मिळत आहे.परंतू ती दाम दुप्पट विक्री करुन अवैध विक्रेते उखळ पांढरे करत आहेत.यामुळे काही दारुड्यांना ती दारु दाम दुप्पट घेऊन पिणे अशक्य झाल्यामुळे हातभट्टी दारु व रसायन मिश्रीत शेंदी,दारु अवैध विक्रीत्यांनी त्यांना उपलबद्ध करुन देणे सुरु केले आहे.यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येण्याचीही शक्यता आहे.कर्तव्यदक्ष जिल्हाधीकारी अरुण डोंगरे यांनी या गंभीर बाबीची दखल घेतली व राज्य उत्पादन शुल्क विभाग ,नांदेडच्या अधिका-यांना या अवैध दारु विक्रीवर आला घालण्यासाठी आदेशीत केले.यामुळे उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग आली व त्यांनी प्रभारी अधीक्षक डी. एन. चिलवंतकर यांच्या समवेत निरीक्षक एस. एस. खंडेराय, पी. ए. मुळे, आर. एस. कोतवाल, दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, बी. एस. मुंडलवाड, व्ही. व्ही. फुलारी, पी. बी. गोणारकर, के. के. किरतवाड, के. आर. वाघमारे, कोरनुळे, फाळके, दासरवार, संगेवार, इंगोले, अन्नकाळे, यु. डी. राठोड, अमोल राठोड, नंदगावे, एफ. के. हतीफ, डी. के. जाधव, आशाताई घुगे यांचा समावेश असलेले कर्मचारी विभागून पथके केली आणि हदगाव तालुक्यातील चिकाळा तांडा, मुदखेड शहर, भोकर तालुक्यातील गारगोटवाडी, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद, देगलूर तालुक्यातील लोणीतांडा व मरखेड याठिकाणी २० व २१ जून २०१७ रोजी छापे मारले.यावेळी त्यांना अवैध विक्रीसाठी साठविलेली २४ लीटर देशी दारु,२३० लीटर हातभट्टी दारु , २ हजार ४६० लीटर दारु बनविण्याचे रसायन व हातभट्टी दारु बनविण्याचे साहित्य असा एकूण ७४ हजार ९६१ रुपयाचा मुद्येमाल मिळाला.तो जप्त करण्यात आला व मुंबई दारुबंदी कायदा १९४९ च्या कलमान्वये १६ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.


Next Story
Share it
Top
To Top