तीन महिन्याच्या बाळाच्या आणि पतीच्या गळयावर चाकू ठेवून महिलेवर सामूहिक बलात्कार

तीन महिन्याच्या बाळाच्या आणि पतीच्या गळयावर चाकू ठेवून महिलेवर सामूहिक बलात्कार

मुजफ्फरनगर जिल्ह्यातील भोपा कस्बे भागात सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घटली आहे. पीडित महिला आणि पती गाडीवरून गावी परत असताना ही घटाना घडली आहे. दोघांसोबत तीन महिण्याचा बाळ होतं बाळाला डॉक्टरला दाखवुन परतत असताना पाच जणांनी गाडी थांबून पतीच्या गळयावर चाकू ठेवून पतीसमोरच पाच जणांनी बलात्कार केल्याची धक्कादजायक घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की सकाळी अकरा वाजता निरगाजनी गावाजवळच्या रस्त्यावर कारमध्ये असलेल्या चार जणांनी महिला आणि तिच्या पतीला घेरून त्या मुलाला त्यांच्याकडून हिसकावून घेतलं. तसंच पीडितेच्या पतीला बांधून ठेवलं. त्यानंतर मुलाच्या मानेवर चाकू ठेवून तसंच बंदूकीचा धाक दाखवून महिलेला ऊसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. या घटनेची कुठेही माहिती द्यायची नाही, अशी धमकीही या नराधमांनी त्या दोघांना दिली. आरोपी पीडित महिलेच्या पतीला मारहाण करून ते तेथून पसार झाले. घटनास्थळी त्या दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्या गावातील काही लोक तेथे त्यांची मदत करण्यासाठी आले. तुमच्या मुलाला मारून टाकू अशी धमकी आरोपी देत असल्याचं पीडित महिलेने सांगितलं आहे.


Next Story
Share it
Top
To Top