प्रेमाला नकार देणाऱ्या इंजिनिअर मुलीची जीवंत जाळून हत्या
बेंगळुरूः प्रेमाला नकार देणाऱ्या इंजिनिअर मुलीला पेट्रोल टाकून जीवंत जाळल्याचा प्रकार बेंगळुरूमध्ये उघडकीस आला आहे. इंदुजा नावाच्या तरुणीसोबत आकाश एकतर्फी प्रेम करत होता. दोघे एका वर्गात शिकले. परंतु इंदुजाने त्याला नकार दिला होता. तरीही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. सोमवारी रात्री तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. परंतु तिने त्याच्याशी बोलणे टाळले. याचा राग आल्याने त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून लायटरने पेटवून दिले. इंदुजाला वाचवण्यासाठी तिची आई व बहिण धावून आले. परंतु त्यांचे प्रयत्न फोल ठरले. यात तरुणीची आई गंभीर जखमी झाली तर इंदुजाला वाचवण्यात यश आले नाही. या घटनेमुळे आयटी हब असलेल्या बेंगळुरूत मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी आकाशला अटक केली आहे.
Next Story