मॉडेलने मित्रासोबत सेल्फी काढल्याने प्रियकराने केला बलात्कार करण्याचा प्रयत्न

मॉडेलने मित्रासोबत सेल्फी काढल्याने प्रियकराने केला बलात्कार करण्याचा प्रयत्न

ओशिवरा परिसरात राहणा-या एका मॉडेलने आपल्या प्रियकराविरेधात जबरदस्ती केल्याचा गुन्हा नोदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. मॉडेलची ओळख काही महिण्यापुर्वी संजय कटेल कास्टिंग डारेक्टरसोबत झाली होती. यानंतर दोघात चांगली मैत्री झाली. संजयने तीन महिण्यानंतर मॉडेलला आनंदकडे असोसिएट डायरेक्टर म्हणून कामासाठी पाठविले.या ओळखी नंतर आनंद आणि मॉडेल यांच्यात मैत्री झाली. ज्याचे काही दिवसांनी प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर त्याने मॉडेलला लग्नासाठी मागणी घातली. मात्र आनंदची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने ती सुधारल्यानंतर आपण लग्न करू, असे तिने त्याला सांगितले. दरम्यान, तिने आनंदला लाखभर रुपयांची मदतदेखील केली.

तिच्या घरच्यांनी तिचे लग्न तिच्या एका जुन्या मित्रासोबत जुळवले. मात्र तिने त्याला नकार दिला. मात्र 8 ऑक्टोबर रोजी संजयच्या वाढदिवसाला आरतीच्या लोखंडवाला परिसरातील फ्लॅटमध्ये आरती, संजय, एक मित्र अजय जांगड आणि आनंद पार्टी करत होते. त्या वेळी संजयसोबत सेल्फी काढताना आनंदने आरतीला पहिले. संजय सोबत आरतीला सेल्फी काढताना पाहून आनंदचा पारा अचानक चढला आणि रागात तो तिला खेचून बेडरूममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिथे असलेल्या संजय आणि अजयने तिला वाचविले असे तिने पोलिसांना सांगितल


Next Story
Share it
Top
To Top