मुंबई । गेल्या आठवड्यात दादरच्या फुल मार्केटमध्ये मनोज मोर्ये या इसमाची दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी अंगावर गोळ्या झाडून हत्या केली होती. ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचे उघडकीस झाले आहे. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केले असून या हत्ये मुख्य सुत्रधार आरोपी राधेकृष्ण खुशवाह यांच्यासह राजेंद्र अहिरवाह आणि हेमंत खुशवाल अशा तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राधेकृष्णने राजेंद्र आणि हेमंतल ५० हजार रुपयांची सुपारी देऊन मनोजची हत्या करण्यास सांगितले होते.
मुंबईत येऊन या दोघांनी मनोजची हत्या केली आणि आरोपी दिल्लीला फरार झाले. मुंबई पोलिसांनी आरोपींना दिल्लीहून अटक केले आहे. मनोजची पत्नी आणि राधेकृष्णा यांची मैत्री होती, ती मैत्री मनोजला मान्य नव्हती म्हणून मनोज पत्नीला घेऊन मुंबईला आला,अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्यानंतर ही मनोजच्या पत्नीचे आणि राधेकृष्ण एकमेकांच्या संपर्कात होते. राधेकृष्णला मनोजच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम झाले होते. तिला मिळवण्यासाठी त्यांनी मनोज मोर्येची हत्या असल्याचे समजते.