[video width="640" height="352" mp4="https://hwmarathi.in/wp-content/uploads/2018/01/VID-20180116-WA0178.mp4"][/video]
पुणे – दौंड तालुक्यात गोळीबारीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. संजय शिंदे असे या व्यक्तीचे नाव असून हा एसआरपीचा जवान असल्याची माहिती मिळली आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास नगर मोरी चौकात गोळीबार केला. यानंतर १० ते १५ मिनिटाच्या अंतराने शिंदे याने बोरावके नगरमध्ये पुन्हा गोळीबार केला आहे.
या गोळीबारीत अमोल जाधव, गोपाळ शिंदे आणि प्रशांत पवार असे या मृत व्यक्तीची नावे आहेत. संजय शिंदे यांनी कोणत्या वादातून त्यांनी या तिघांवर गोळीबार केला? याचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेनंतर आरोपी संजय शिंदे पळून गेला असून पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे.