रेल्वेच्या टॉयलेटमध्ये सापडल्या दोन हजार दारुच्या बाटल्या

रेल्वेच्या टॉयलेटमध्ये सापडल्या दोन हजार दारुच्या बाटल्या

मुंबईः गोव्यातील मडगाव येथून गुजरात राज्यात कर चुकवून दारूचा साठा पाठवला जाणारा दारुचा साठा रेल्वे पोलिसांनी जप्त केला. कोचीवली-पोरबंदर एक्सप्रेसच्या टॉयलेटच्या वरच्या बाजुला प्लायवूडमध्ये सुमारे दोन हजार व्होडकाच्या बाटल्या ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पनवेलजवळ रेल्वे पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली असता त्यांना हा साठा आढळून आला. टॉयलेटमधून बीओबी, व्होडकाच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. जप्त केलेले मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात दिले आहे. महात्मा गांधी यांच्या जंयतीच्या दिवशी या बाटल्याची वाहतूक केली जात होती. त्यामुळे या कारवाईला महत्व प्राप्त झाले असून गांधींच्या मूळ राज्यात म्हणजे गुजरातमध्ये मद्यविक्रीस बंदी असताना हा साठा कोणी व कशासाठी पाठवला होता. याचा पोलिस तपास करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top