उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी प्रमुख साक्षीदार आयुक्तांचा माफीनामा होणार गुन्ह्यातील पुरावा

आयुक्त निंबाळकर यांना दोन दिवसात अटक न केल्यास रिपब्लिकन पक्ष उतरणार रस्त्यावर

उल्हासनगर(गौतम वाघ)- उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या विरोधात उल्हासनगर मधील सेंट्रल पोलीस स्टेशन मध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणात शिवसेनेचे शहर प्रमुख आणि नगरसेवक राजेंद्र चौधरी प्रमुख साक्षीदार आहेत. शिवाय आयुक्तांनी याप्रकरणात दिलेला माफीनामा आणि व्यक्त केलेली दिलगिरी ही त्यांच्या विरोधात पुरावा म्हणून पुढे आलेला आहे

उल्हासनगर महापालिकेतील विविध पक्षांच्या गट नेत्यांना स्वतंत्र दालन देण्यास आयुक्तांनी केलेला विरोध आणि दालनास लावलेले सील येथून वादास सुरुवात झाली, याबाबत जाब विचारण्यास आरपीआयचे गटनेते भगवान भालेराव गेले असता, आयुक्त आणि भालेराव यांच्यात वाद झाला त्यावेळी रागात आयुक्तांनी "मला महापालिकेचा महारवाडा बनवायचा नाही " म्हणाले, त्यावेळी तिथे महापालिकेचे अधिकारी आणि शिवसेनेचे शहर प्रमुख व नगरसेवक राजेंद्र चोधरी देखील उपस्थित होते. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने भगवान भालेराव यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला, न्यायालयाने महापालिका आयुक्ता सह 3 पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले पोलिसांनी याप्रकरणात मुख्य साक्षीदार राजेंद्र चोधरी यांचा जबाब नोंदविला असून त्यांनी आयुक्तांनी जातीयवाचक बोललयाचे आपल्या जबाबात नोंदविले आहे

याप्रकरणात उच्च पोलीस अधिकारी सुद्धा आरोपी असल्याने पोलिसांनी याप्रकरणात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, मात्र आरपीआयचे शहर प्रमुख भगवान भालेराव यांनी दोन दिवसात पोलिसांनी आयुक्तांना अटक न केल्यास रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे.


Next Story
Share it
Top
To Top