अमेरिकेचा सिरियावर हल्ला, ४२ ठार

अमेरिकेचा सिरियावर हल्ला, ४२ ठार

रक्का(वृत्तसंस्था): सीरियातील रक्का शहराजवळ अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ४२ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १९ लहान मुले आणि १२ महिलांचा समावेश आहे. गेल्या ८ दिवसांत हवाई हल्ल्यात सुमारे १६७ नागरिकांनी जीव गमावला आहे. सीरियातील रक्कामध्ये आयसिसच्या तळांवर सीरिया, रशिया आणि अमेरिकन सैन्याचे हवाई हल्ले सुरू केले आहेत. मात्र, हे हवाई हल्ले सर्वसामान्यांच्या जिवावर बेतू लागले आहेत. सोमवारी रक्का शहराजवळ अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ४२ नागरिकांचा मृत्यू झाला. या वृत्तावर अमेरिकेच्या सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सीरियात काम करणा-या समाजसेवी संस्थांनी या वृत्ताला दुजोरा दिला.


Next Story
Share it
Top
To Top