भरदिवसा सशस्त्र दरोडा; 15 मिनिटांत लुटला कोट्यावधीचा ऐवज
मुंबई: नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर १७ मधील कुसुम सोसायटीत राहाणारे भाजीपाल्याचे व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या घरी दिवसाढवळा शस्त्रास्त्र दरोडा पडला. पाच अज्ञात पुरुषांसह एका महिलेने अरुण मेनकुदले यांच्या घरात घुसून दोन कोटी नऊ लाखांचा ऐवज लुटून पसार झाले. त्यात सोन्याचे दागिने, महागड्या वस्तू आणि रोख रकमेचा समावेश होता. सर्व चोरटे कुरिअर बॉयच्या वेशभुषेत आले होते. त्यांनी आधी दरवाज्याची बेल वाजवली. दरवाजा उघडताच सगळे घरात घुसले. त्यांनी अरुण मेनकुदळे यांची पत्नी आणि मुलीला रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवला. त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली. घरात ठेवलेले सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि महागड्या वस्तू घेऊन अवघ्या 15 मिनिटांत पसार झाले. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Next Story