विमानतळावरुन अॅमेझॉनच्या ५१ लाखाच्या वस्तू चोरी

विमानतळावरुन अॅमेझॉनच्या ५१ लाखाच्या वस्तू चोरी

मुंबई – ग्राहकांनी अॅमेझॉनवरुन तात्काळ डिलीव्हरीसाठी विमानातून मागविलेल्या महागड्या वस्तू कोणीतरी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान ५१ लाखांच्या वस्तू चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीच्या घटना महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन्ही विमानतळावर जास्त प्रमाणात घडल्या आहेत.अॅमेझॉनच्या सिक्युरिटी प्रिव्हेन्शन मॅनेजर प्रणव बोराळे यांनी अशी तक्रार दोन्ही विमानतळ पोलिसांकडे केली आहे. यात २३२ महागडे मोबाइलचा समावेश असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी अॅमेझॉनच्या व्यक्त केली आहे.

अॅमेझॉनच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन्ही विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅमेझॉन ही ऑनलाईन शॉपिंग कंपनी असून नागरिकांनी मागणी केल्याप्रमाणे ग्राहकांना वस्तू पुरविण्याचे काम ही कंपनी करते. कंपनीकडून नेमलेले डिलिव्हरी बॉय वस्तू ग्राहकांना मिळाल्यानंतर पैस घेतात किंवा ग्राहक ऑनलाईन पैसे देतात. चोरीच्या घटना सतत वाढत असल्यामुळे कंपनीकडून देखील यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रथम दर्शनी कंपनीतील काही कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


Next Story
Share it
Top
To Top