सारा तेंडूलकर शरद पवारांवर टिका करते तेंव्हा....

- साराच्या नावानं फेक ट्विटर अकाऊंट

मुंबई - भारतरत्न सचिन तेंडूकरची मुलगी सारा तेंडूलकर हीनं चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. हे वाचून धक्का बसला ना... पण थांबा....तसं काही नाही. कारण सारा तेंडूलकरच्या नावानं ट्विटरवर फेक अकाऊंट काढण्यात आलं होतं. त्या अकाऊंट वरून थेट शरद पवारांवरच टिका करण्यात आली होती.

या फेक अकाऊंट वरून ट्विटरवरून ‘शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांनी केंद्रालाही लुटायचा प्रयत्न केला, हे फारसं जगजाहीर नाही’ असं ट्वीट या अकाऊंटवरुन ९ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते.

या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सचिन तेंडूलकरला ट्विटर वरूनच माहिती दिली आहे. शिवाय याबाबत रितसर तक्रारही करावी अशी सुचना त्यांनी ट्विटरवरूनच केली आहे.


Next Story
Share it
Top
To Top