अंबरनाथमध्ये तरुणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

अंबरनाथमध्ये तरुणीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

अंबरनाथ (गौतम वाघ) तरुणीची हत्या करून तरुणाने हत्या केल्याचा प्रकार अंबरनाथच्या कानसई गाव परिसरात घडला आहे. मृत तरुणीचे नाव आचल महल्ले (२०) असून ती दिवा येथे राहणारी आहे. कानसई गावात राहणाऱ्या नत्राम वर्मा (२५) या विवाहित तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती असून त्यातूनच ती दिवाळीला त्याच्या घरी राहायला आली होती.

यानंतर त्यांच्यात वाद होऊन नत्रामने तिची गळा आवळून हत्या केली आणि नंतर स्वतःही गळफास घेतला. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह कुजलेला असल्यानं तिची हत्या किमान ३ दिवस आधी झाली असण्याची शक्यता आहे. यानंतर काल रात्री नत्रामने स्वतः तरुणीच्या कुटुंबियांना फोन करून मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि मग स्वतः आत्महत्या केली. मुलीच्या नातेवाईकांनी यानंतर कानसई गावात धाव घेतली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


Next Story
Share it
Top
To Top