उंदीर मारण्याचे औषध घेऊन तरूणाची आत्महत्या

मुंबई - व्हॉट्सअपवर सुसाइट नोट टाकून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगत गोरेगाव पुर्वेला राहणा-या 24 वर्षीय तरुणाने उंदीर मारण्याचे औषध घेतले. शमुवेल घोरपडे असे तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट केली होती. तरुणाने आपले नातेवाईक आणि मित्रांना ही सुसाईट नोट पाठवली होती. अशोक नगरमध्ये राहणाºया शमुवेल घोरपडे याने पाठवलेला मेसेज पाहून घोरपडे कुटुंबियांची झोपच उडाली. मेसेजमध्ये लिहिलं होतं की, ‘मी आत्महत्या करत आहे. मी जीव देत असून यासाठी कोणीही जबाबदार नाही’. शमुवेल घोरपडेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मेसेज सकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास आला होता. मेसेज आल्यानंतर कुटुंबियांनी शमुवेलचा शोध घेण्यासाठी धावाधाव सुरू केली.

खूप वेळ शोध घेऊनही शमुवेलचा काही पत्ता लागत नव्हता. अखेर एका रिक्षामध्ये शमुवेल मृतावस्थेत आढळला. कुटुंबियांनी यानंतर वनराई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी शमुवेलला बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंट्रलमध्ये नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी शमुवेलचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास टाकत देवाचे आभार मानले आणि शमुवेलला घेऊन घरी आले. परंतु दुसºया दिवशी पुन्हा त्याला त्रास सुरू झाला. संपूर्ण शरिरात विष भिनले होते. अखेर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


Next Story
Share it
Top
To Top