झरेवाडीच्या रंगीला बाबा अखेर अटकेत

झरेवाडीच्या रंगीला बाबा अखेर अटकेत

रत्नागिरी- हरियाणामधील बलात्कारी बाबा राम रहिमचा भाऊ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील झरेवाडी येथे आढळून आला असून त्याने अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. श्रीकृष्ण पाटील असे या बाबाचे नाव असून, तो स्वत:ला स्वामी समर्थांचा अवतार मानतो. पोलिस दलात चालक पदावरून निवृत्ती घेऊन आपले त्याने बुवाबाजीतील बस्तान बसवले होते.

रत्नागिरीपासून 12 किमी अंतरावर झरेवाडीचा हा भोंदू महाराज स्वामी समर्थ मंदिरात असतो. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये या उक्तीवर लोकांना फसवत चालला आहे. एका महिलेला अवार्च्च भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार केल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात या बाबाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही बाबाच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सोबतच बाबांचे रंगीले किस्से आता सोशल मिडियात व्हायरल होत आहेत. त्यामुळे हा महाराष्ट्राचा राम रहिम अचानक चर्चेत आला आहे.


Next Story
Share it
Top
To Top