HW News Marathi
मनोरंजन

मुंबईतील ‘या’ चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा करतात नाताळ

मुंबई | मुंबईसह भारतात अनेक पुरातन बांधणीतील चर्च आहेत. त्यातील काही चर्च ही ब्रिटिशांनी बांधलेली आहेत. तसेच मुंबईत अनेक कॅथलिक कम्युनिटीही आहेत. ख्रिसमससाठी अनेक कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत केले जाते. मुंबईतल्या अनेक चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीने आजही नाताळ साजरा केला जातो. तुम्ही खास नाताळसाठी मुंबईत येणार असल्यास किंवा मुंबईतल्या मुंबईत जर असे पारंपारिक पद्धतीने नाताळ साजरा करण्यासाठी चर्च शोधत असाल तर आम्ही काही मुंबईतील प्रसिद्ध चर्चविषयी सांगणार आहोत. जिथं आजही पारंपारिक पद्धतीने नाताळ साजरा केला जातो.

होली नेम कॅथड्रेल, कुलाबा

या चर्चला वेडहाऊस चर्च असेही म्हणतात. हे चर्च याआधी भुलेश्वरला होते. त्यानंतर भुलेश्वरचं चर्च पाडून कुलाब्यात बांधण्यात आले. कुलाब्यातले चर्च १९०५ साली सुरू झाले. या चर्चमध्ये नाताळच्या सेलिब्रेशनसाठी ३ हजाराहून अधिक लोक येत असतात. रात्री ९.३० वाजता कॅरोल गायनाला सुरुवात होते. त्यानंतर १० ते ११.३० पर्यंत मास सुरू होतो.

सेंट जॉन चर्च, कुलाबा

अफगाण चर्च म्हणून ओळख असलेल्या या चर्चची बांधणी ब्रिटिशांनी केली आहे. १८३५ ते १८४३ या काळात झालेल्या अफगाण युद्धात अनेक सैनिकांचे त्यांचे प्राण गमावले होते. या सैनिकांच्या मृत्यूप्रतिर्थ हा चर्च बांधण्यात आला होता. म्हणूनच या चर्चला अफगाण चर्चही म्हणतात. हेरिटेज वास्तू म्हणूनही या चर्चची ओळख आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला वाईल्ड वॉईस चॉयर यांच्याकडून कॅरोलचं गायन १०.३० च्या दरम्यान सुरू होते.

सेंट थॉमस कॅथड्रेल, फोर्ट

१७१८ साली बांधण्यात आलेल्या चर्चमध्ये आजही पारंपारिक पद्धतीने नाताळ साजरा केला जातो. या चर्चच्या उत्कृष्ट बांधकामामुळेही हे ओळखले जाते. पांढऱ्या शुभ्र भल्या मोठ्या दालनात प्रार्थना करण्याची मजा काही औरच आहे.

ग्लोरिया चर्च, भायखळा

या चर्चचा एक वेगळाच इतिहास आहे. १५७२ साली इंग्लडमध्ये हा चर्च बांधण्यात आला होता. त्यानंतर थेट भायखळ्यात १९१० साली हा चर्च शिफ्ट करण्यात आला. १९१३ साली हे बांधकाम पूर्ण झाले. चर्चचा भलामोठा टॉवर आणि त्याच्या आजूबाजूला आणखी ४ टॉवर इथं बांधण्यात आले आहेत. नाताळसाठी नाताळच्या पूर्वसंध्येला ११.३० वाजता इथे कॅरोल गायन सुरू होतं.

सेंट मिशेल चर्च, माहिम

१६ व्या शतकात बांधलेले हे चर्च भारतातील जुन्या चर्चपैकी एक आहे. १९७३ साली या चर्चचे दुरुस्तीकरण करण्यात आलं. जुने चर्च असल्यामुळे मुंबईतील अनेक ख्रिस्ती बांधव इथे येत असतात. तसेच, मुंबईला भेट देणारे पर्यटकही इथं नाताळच्या कॅरोल गायनाला उपस्थित राहतात. नाताळसाठी हे चर्च आकर्षक रोषणाईने उजळून निघते. त्याचप्रमाणे बाहेरचा परिसरही जत्रेमुळे बहरून येतो.

माऊंट मेरी बॅसिलिका, वांद्रे

मुंबईतले सगळ्यात मिडनाईट माससाठी माऊंस मेरी बॅसिलिका चर्च प्रसिद्ध आहे. एका हिलवर हे चर्च असल्याने बॅण्ड स्टण्डचा सुंदर नजाराही इथून दिसतो. तसेच, चर्चची ही इमारत तब्बल १०० वर्ष जुनी आहे.

सेंट एंड्रयू चर्च, वांद्रे

वांद्रयातील हे सगळ्यात पहिलं चर्च आहे. १५७५ साली हे चर्च बांधण्यात आले होते. सेंट पिटर्स आणि सेंट मॅरीमध्ये गर्दी झाल्यावर मुंबईकर या चर्चकडे मोर्चा वळवतात. नाताळ मास इथे १०.३० नंतर सुरू होतो.

लेडी ऑफ इमैक्युलेट कन्सेप्शन, बोरीवली

मुंबई उपनगरातील हे सगळ्यात महत्त्वाचे चर्च आहे. मुंबईतील जुने चर्च म्हणूनही या चर्चकडे पाहिले जाते. इकडे नाताळ मासही तितकाच प्रसिद्ध आहे. वर्षभरात १२ हजाराहून अधिक लोक इथे भेट देतात. नाताळसाठी ९.३०च्या दरम्यान इथे कॅरोल सुरू होतो तर नाताळ मास १० च्या दरम्यान सुरू होतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एजाज खानला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

swarit

दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश !

News Desk

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन

News Desk