HW News Marathi
मनोरंजन

चॉकलेट फज

ख्रिश्चन समुदाय भारतात मोठ्या प्रमाणात नसला तरी भारतात नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्व ख्रिश्चन बांधव आपली घरे सुशोभित करातात. या उत्सवासाठीची तयारी आठवडाभरपुर्वीपासुनच सुरु होते. उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मित्र परीवारात भेटींचे आयोजन केले जाते. उत्सव कुठलाही असू द्या तो विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांशिवाय अपुर्णच. चमचमीत असे, तर काही तोंड गोड करणारे असे मिष्टान्न असले की उत्सवाची रंगत काही औरच असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नाताळ उत्सवासाठी केल्या जाणाऱ्या अशाच काही खास पाककृती.

साहित्य

चार चमचे कोको पावडर

दोन चमचे साखर

अर्धी वाटी कंन्डेंस्ड मिल्क

दोन चमचे लोणी

व्हॅनीला इसेंस

अर्धी वाटी अक्रोट

कृती

एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवा

त्या पॅनमध्ये आधी कंन्डेंस्ड मिल्क घ्या त्यामध्ये साखर, लोणी, इसेंन्स कोको पावडर टाकुन मिश्रण तयार करा मंद आचेनवर हे मिश्रण सतत हलवत राहा. ३ ते ४ मीनिटा नंतर हे मिश्रण तयार होइल. तुप सुटायला लागले की समजावे मिश्रण तयार आहे.

नंतर गॅस बंद करुन मिश्रणात अक्रोटचे तुकडे करुन घालुन चांगले मिसळून घ्या.

तयार सारण एका चौकोणी भांड्यात घालुन थंड करायला ठेवा ३० मी. नंतर त्याच्या वड्या कापुन घ्या.

चॉकलेट फज तयार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पद्मावत’ सिनेमाला देशभरातून विरोधात निदर्शने

News Desk

मकरसंक्रांत स्पेशल तिळाच्या करंज्या

News Desk

सनी लिओनीचे आणखी एक आयटम सॉग

News Desk