HW News Marathi
मनोरंजन

कल्याण-डोंबिवलीत नायलॉन मांजावर बंदी ?

डोंबिवली | जस जशी मकरसंक्रांत जवळ येत आहे. तस तशी आकाशात पतंग उडविण्यासाठी मुलांमध्ये उत्सहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आकाशात पतंग उडविण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा लावल्या जातात. या स्पर्धेत पक्ष्यांच्या जीवाशीही खेळ खेळला जातो. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनच्या मांज्यामध्ये अडकून अनेक पक्षी जखमी होत असल्याची खंत पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नायलॉन मांज्याच्या विक्रीस बंदी आणावी आणि ज्या दुकानांत नायलॉनचा मांजा विकला जातो, अशा सर्व दुकानांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षीप्रेमींकडून केली आहे. नायलॉनचा मांजा तुटत नसल्यामुळे उडणारे पक्षी त्यात अडकून पडतात आणि वेळेत त्यांची सुटका न केल्यास ते तडफडतात. त्यामुळे सुती मांजाचा वापर पतंगप्रेमींनी करावा, असेही आव्हान पक्षीप्रेमींनी केले आहे.

गतवर्षी घुबडा शिवाय तीन दिवसात १ वटवाघूळ, २ कबुतर जखमी अवस्थेत सापडले असून त्याच्यावर उपचार केले होते. ८ ते १२ जानेवारी या दरम्यान पक्षी जखमी होण्याचे प्रमाण जास्त वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयललिता यांचा ‘द आयर्न लेडी’ बायोपिक सिनेमा लवकरच

Gauri Tilekar

…हे नवीन गाणे ट्रेंड स्थापित करण्यास सज्ज

News Desk

प्रियंका चोप्रा-निक जोनस यांचा जुलै-ऑगस्टमध्ये साखरपुडा

News Desk