HW News Marathi
मनोरंजन

संक्रांतीच्या मुहूर्तावर ‘ठाकरे’ पतंगांची क्रेझ

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. बहुचर्चित ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता त्यावर चर्चा देखील होऊ लागल्या आहेत. हा सिनेमा आणि मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर अनोख्या पद्धतीने ठाकरेंच्या चहात्यांनी स्वत:या सिनेमाचे प्रमोशन करण्याचा निर्धार करून पतंग बनवून अनोख्या पद्धतीने सिनेमाचे प्रमोशन केले आहे.

मुंबईतील डोंगरी परिसरातील ८० वर्ष जुन्या असलेल्या डोंगरी काईट सेंटर या दुकानात भगव्या रंगाची ‘ठाकरे’ असे लिहलेली पतंग बनविण्यात आली आहे. यावेळी दुकानदार मोहम्मद मलिक यांच्याशी एचडब्ल्यूशी खास बातचीत केली असता त्यांनी म्हटले की, अशा ५०,००० पतंग आम्ही बनविल्या आहेत. आमचे बाळासाहेबांवर फार प्रेम असून आम्ही बाळासाहेबांना खूप मानतो. तसेच बाळासाहेब हे महाराष्ट्राचे दैवत असून त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमात हा जगभरात सुपरहिट होण्यासाठी आम्ही या सिनेमाचे प्रमोशन करत आहोत, असे मलिक यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ganesh Chaturthi 2018 | मुंबईत हिऱ्यामध्ये अवतरले बाप्पा

News Desk

बीग बी अमिताभ यांच्याकडून मुंबई स्पीरिटचे कौतुक

News Desk

welcome2019 : नववर्षाच्या स्वागतासाठी सजले देशाचे महाद्वार

News Desk