HW News Marathi
मनोरंजन

या मकरसंक्रांतीला अशी बनवा खमंग तिळगूळ पोळी

मकरसंक्रांत हा सण भारतात विविध प्रकारे साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरु होते, म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकण्यास सुरवात होते. या बदलाला अतिशय शुभ मानले जाते. भारताच्या विविध भागात संक्रांती या सणाची विविध नावे आहेत. महाराष्ट्रात मकरसंक्रांती, गुजरातमध्ये उत्तरायण, तामिळनाडुतील थाई पोंगल तर आसाम मधील भोगली बिहू. हिच विविधता येथील खाद्यपदार्थांमध्येही दिसून येते. येणाऱ्या मकरसंक्रांतीनिमित्त अशाच काही विविध पारंपारिक खाद्यपदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य

तीळ २ वाटी

गुळ

कणिक १ वाटी

मैदा १ वाटी

तूप

खोवा १ वाटी

जायपत्री

वेलची

तेल २ चमचे

बेसन १ वाटी

कृती

पोळीसाठी कृती सर्वप्रथम १ वाटी मैदा आणि १ वाटी कणिक एकत्र घ्या त्यात चिमूटभर मीठ घाला नंतर त्यामध्ये २ छोटे चमचे तेल घाला. शेवटी पाणी घालून कणिक मळून घ्या, हा गोळा थोडा घट्टच भिजवा.

सारण बणविण्याची कृती एका पॅन २ वाटी तीळ घेऊन मंद आचेवर भाजून घ्या, थंड करुन मिक्सरमध्ये बारीक करुन बाजूला ठेवा. दुसऱ्या एका पॅनमध्ये १ वाटी खवा घेउन गॅसवर ठेवून थोडा परतून घ्या आणि बाजूला थंड करायला ठेवा. त्याच पॅनमध्ये १ वाटी बेसन घेऊन त्यात थोड तूप टाकून परतवून घ्या. वरील सर्व साहित्य एका भांड्यात घेऊन त्यात एक वाटी गूळ घालून सर्व साहीत्य व्यवस्थित एकत्र करुन पोळीत भरण्यासाठी सारण तयार करुन घ्या.

भिजवलेल्या कणकेचा एक गोळा घेऊन त्याचा वाटीसारखा आकार करा त्यात पुरणपोळी सारखे वरील सारण भरुन पोळी लाटून घ्या, तव्यावर तूप घालून पोळी शेकून घ्या, गरमा गरम तिळगूळ पोळी तयार.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dahi Handi | स्मिता गोंडकर हिने फोडली सेलिब्रिटी हंडी

News Desk

श्रेयस चे विठ्ठला विठ्ठला  

News Desk

स्वारातीम विद्यापीठातर्फे २४ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान संगीत तथा नाट्यकला महोत्सवाचे आयोजन 

News Desk