HW News Marathi
मनोरंजन

#IndianNavyDay : …असा आहे भारतीय नौदलाचा इतिहास

भारतीय सागरी सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या भारतीय नौदलाची स्थापना ५ सप्टेंबर १६१२ रोजी झाली होती. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या युद्ध नौकांचा जथा सूरत बंदरात पोहचला होता. १९३४ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीची स्थापना झाली. परंतु दरवर्षी ४ डिसेंबर रोजी ‘इंडियन नेव्ही डे’ साजरा करण्याचे कारण त्याच्या गौरवशाली इतिहासाशी संबंधित आहे.

भारतीय नौदलाचा इतिहास १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धाशी निगडीत आहे. ज्यामध्ये भारताने पाकिस्तानवर केवळ विजयच मिळविला नाही तर पूर्व पाकिस्तानला आझाद करुन स्वतंत्र्य राष्ट्र म्हणून प्रस्थापित करुन ‘बांग्लादेश’चा दर्जा दिला. दरवर्षी या गौरवशाली इतिहासाचे स्मरण म्हणून ४ डिसेंबर रोजी भारतीय नौसेना नौदल दिन साजरा करते. भारतीय नौदलाचा पाया १७ व्या शतकात रचला गेला होता. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची भारतात स्थापना झाली होती.

२६ जानेवारी १९५० रोजी भारत एक गणराज्य बनले आणि त्याच दिवशी भारतीय नौदलाने आपले नाव ‘रॉयल’ सोडून दिले. त्यावेळी, भारतीय नौसेनामध्ये ३२ नौ-परिवहन पोत आणि सुमारे ११,००० अधिकारी आणि नौदल कर्मचारी होते. १५ ऑगस्ट १९४७ मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या नौदलात जुन्या युद्ध नौका होत्या.

आयएनएस ‘विक्रांत’ ही भारतीय नौदलातील प्रथम युद्ध नौका होती. ही १९६१ मध्ये भारतीय सैन्यात समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर आयएनएस ‘विराट’ १९८६ मध्ये भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली. जे भारताची दुसरी युद्धनौका म्हणून ओळखली जाऊ लागली. या भारतीय नौदलात पेट्रोल-पाणबुड्यांसोबतच , युद्धनौका, लढाऊ गलबत जहाज, कॉर्वेट जहाज यांसारख्या अनेक विविध प्रकारच्या वस्तू आहेत.

याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाच्या उड्डान सेवेला सुरुवात कोचीमध्ये आयएनएस गरुड समाविष्ट झाल्यानंतर झाली. यानंतर जेट्सच्या दुरुस्ती व देखभालसाठी कोइंबटूरमध्ये आयएनएस ‘हान्स’ समाविष्ट करण्यात आले. भारतीय नौदलाने जल सीमेवर अनेक प्रमुख ऑपरेशनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्यामध्ये नौदलाने १९६१ मध्ये पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारतीय सैन्याला मदत केली होती. याशिवाय १९७१ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले तेव्हा नेव्हीने आपले महत्व सिद्ध केले. इंडियन नेव्हीने देशाच्या सीमा संरक्षणासह संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने शांती प्रस्थापित करण्यासाठी भारतीय सैन्याला नेहमी मदत केली आहे. सोमालिया मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे ऑपरेशन हा याचाच एक भाग होता.

देशाच्या स्वत: च्या जहाज बांधणीच्या प्रकल्पाच्या दिशेने प्रारंभिक पाऊल उचलताना भारतीय संरक्षण मंत्रालयाने १९६० मध्ये मुंबई (बॉम्बे) च्या माझगाव बंदरात आणि कलकत्ता (गार्डन) च्या गार्डन रीच वर्कशॉप (जीआरएसई) ला आपल्या अख्यारीत घेतले. सध्या भारतीय नौदलचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि ते मुख्य नौदल अधिकारी ‘एडमिरल’ यांच्या नियंत्रणाखाली आहे.

भारतीय नौदल तीन भागात (पश्चिम मुंबई, पूर्वेतील विशाखापट्टणम आणि दक्षिणेमध्ये कोची) या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रत्येकाचे नियंत्रण एका प्लॅग अधिका-या द्वारे केले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk

सण नारळी पौर्णिमेचा

News Desk

रेणुका शहाणेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

News Desk