HW News Marathi
मनोरंजन

‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषावर मुंबई पोलिसांची करडी नजर

मुंबई | नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना या वेळी महानगरात कोणतीही अनुचित किंवा गैरप्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. ३१ डिसेंबरला महत्त्वाच्या तसेच प्रमुख ठिकाणांसह तब्बल ४० हजारांहून अधिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून रविवारी (३० डिसेंबर) दुपारपासून नाकाबंदी करून तपासणी करण्यास सुरुवात होणार आहे.

शहर तसेच उपनगरातील पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक घडामोडीवर पोलीस नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवणार आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, रॅश ड्रायव्हिंग’ विरोधी मोहीम राबविली जाणार असून मद्यपी आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जाईल.

महत्त्वाच्या ठिकाणी मुंबई पोलिसांबरोबरच राज्य राखीव दल, क्यूआरटी, दंगल नियंत्रण आदींची पथके सोमवारी(३१ डिसेंबर) सकाळपासून बंदोबस्तासाठी नेमली जाणार आहेत. या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत सर्व हॉटेल, बार व परमिटरूम खुले ठेवण्याची मुभा असली तरी तेथे तसेच सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन व तरुणींची छेडछाड करणाण्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते मंजुनाथ शिंगे यांनी शनिवारी (२९ डिसेंबर) दिली आहे.

कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच शहर, उपनगरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथकाद्वारे घातपातविरोधी तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय समुद्रकिनारी बोटीच्या साहाय्याने गस्त घालण्यात येणार असून येथील बोट पार्टीलादेखील बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई शहर तसेच उपनगरातील सर्व महत्त्वाचे चौक, गर्दीच्या ठिकाणी रविवारी सायंकाळपासून नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन करून वाहनांची तपासणी केली जाईल. हॉटेल, लॉजेस, गॅरेज, फार्म हाउस आदी ठिकाणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून गैरकृत्यांची घटना घडल्यास त्यांना जबाबदार धरले जाऊन त्यांचे परवाने रद्द केले जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पायल रोहतगीचे शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटनंतर माफी, म्हणे भारतात स्वातंत्र्यच नाही

News Desk

अभिनेता अरमानला अवैध दारुसाठा प्रकरणी अटक

News Desk

येत्या काळात महाराष्ट्र राज्य कबड्डीत देशात अव्वल असेल: होनप्पा गौडा

News Desk