HW News Marathi
राजकारण

मुंबईला थर्टी फर्स्टचे वेध

मुंबई | ह्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी मुंबईत सुरू आहे. त्याच प्रकारे शहरातील बाजारपेठेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध वस्तू दाखल झाल्या असून, वस्तू खरेदीसाठी तरुणाई उत्सुक आहे. दादर, कुर्ला, माटुंगासहित विविध भागात नवनवीन वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या असून, शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध संस्था व संघटनांतर्फे तयारी सुरू आहे.

मुंबईतील क्लब, हॉटेल व्यावसायिकांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी पॅकेजची घोषणा केली आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रमासह जेवण व विविध प्रकारच्या मद्याचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही मुंबईकरांनी शहरापासून जवळ असलेली विरार-अर्नाळा येथील रिसॉर्ट आरक्षित केली आहेत. थर्टी फर्स्ट नाईटसाठी या भागातील सर्व रिसॉर्ट आताच हाऊसफुल्ल झाली आहेत.

अनेक बारमधील थर्टी फर्स्टच्या रात्रीसाठी मेनू कार्ड बदलून त्याचे दर 15 ते 20 टक्क्याने वाढवण्यात आले आहेत. एरव्ही बारमध्ये सिग्‍नेचरचा एक पेग 150 ते 200 रुपयाला मिळतो. हाच दर थर्टी फर्स्टच्या रात्रीला 300 ते 400 रुपये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाईनशॉपमध्ये 1200 ते 1300 रुपयाला मिळणार्‍या प्रीमियम व्हिस्कीसाठी हॉटेलमध्ये 3 ते 4 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. अनेकांनी इमारतीच्या गच्चीवर पार्टीचे आयोजन केले आहे. त्याच्या तयारीसाठी क्रॉफर्ड मार्केट येथील पी. के. वाईन्सबाहेर गेल्या काही दिवसापासून व्हिस्की खरेदीसाठी तळीरामांची गर्दी वाढली आहे.

मुंबईतील क्‍लब व हॉटेलमधील पार्टी महागात पडणार असल्यामुळे अनेकांनी विरार-अर्नाळा येथील रिसॉर्ट थर्टी फर्स्टच्या रात्री आरक्षित केली आहेत. रिसॉर्टमध्ये गुपचूप स्वत:कडील दारू पिण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे तळीरामांचा दारूचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे विरार-अर्नाळा, नवापूर, कळंब आदी भागातील सर्व रिसॉर्ट मालक थर्टी फर्स्टला येणार्‍या मुंबईकरांसाठी सज्ज झाले आहेत. रिसॉर्टने प्रतिव्यक्ती 700 ते 800 रुपये प्रवेश शुल्क व रूमचे स्वतंत्र भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या राम मंदिराच्या सुनावणीची तारीख जानेवारीतच निश्चित होणार !

News Desk

#MarathaReservation : मुख्यमंत्र्यांकडून एटीआर सादर, दुपारनंतर चर्चा

News Desk

नीरेच्या पाण्यावरून राजकारण नको, पाणी हा प्रत्येकाचा अधिकार !

News Desk