HW News Marathi
मनोरंजन

welcome2019 : नवीन वर्षात तरुणांनी केले मुंबई पोलिसांचे कौतुक

मुंबई | मुंबईत सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात होताना पहायला मिळत आहे. सर्वत्र दिव्यांची रोषणाई आणि फटाके फोडून नववर्षाचे तरुणाई स्वागत करत आहे. मात्र शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत आहेत. याची दखल घेऊन मुंबई आणि ठाण्यातील काही तरूण-तरूणींनी या कर्तव्यदक्ष पोलिसांना ३१ डिसेंबरच्या रात्री चहा-बिस्किटे देऊन त्यांच्या कामांचं कौतुक करण्याचा प्रयत्न केला आहे.

या तरुणांनी या उपक्रमाची सुरूवात एका अनोख्या पद्धतीने केली आहे. ज्ञानेश्वरी वेलणकर या तरुणीने २०१५ रोजी या उपक्रमास सुरूवात केली.नववर्षाची पुर्वसंध्या अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचे तिने ठरविले, यामध्ये आपल्यासोबत इतरांनाही आनंद मिळावा हा तिचा उद्देश होता . त्यातून तिने नववर्ष स्वागताच्या रात्री बंदोबस्ताला असणा-या पोलिसांना मदत करण्याचे ठरविले.

या उपक्रमात रस असणा-या तरुणांचा व्हाॅट्सअप ग्रुप तयार झाला आणि दरवर्षी या उपक्रमामध्ये सहभागी होणा-या तरूणांची संख्या वाढत गेली. या उपक्रमासाठी यंदाही ही टीम सज्ज झाली आहे. या टिमने यंदाही गिरगाव परिसरात तैनात असलेल्या पोलिसांना चहा वाटपाचे काम केले. कुटुंबासोबत नवीन वर्षाचा आनंद न लुटू शकणा-या पोलिसांच्या कार्याची दखल घेऊन या तरुणांनी मुंबई पोलिसांच्या चेह-यावर हास्य फुलविल्याचे यावेळी पहायला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हाऊसफुल-4’च्या सेटवर महिला ज्युनिअर आर्टिस्टचा विनयभंग

News Desk

मेघा धाडे मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती

swarit

जाणून घ्या…का साजरी करतात कोजागिरी पौर्णिमा

News Desk