Republic Day | स्टार्ट-अप इंडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रोत्साहन

Republic Day | स्टार्ट-अप इंडियाच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रोत्साहन

मुंबई | २१ व्या शतकात देशाला पुढे नेण्यासाठी तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी, नवी उद्योजक बनविण्यासाठी स्टार्ट-अप इंडिया नेटर्वक उभे करायचे आहे. स्टार्ट-अप इंडियाच्या जगात देश अव्वल स्थानी असेल. स्टार्ट-अप इंडिया आणि देशाच्या भविष्यासाठी स्टॅण्ड-अप इंडिया या कामाला मला पुढे घेऊन जायाचे असल्याचे मनोगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१५ रोजी स्टार्ट-अप इंडियाच्य नव्या मोहिमेची घोषणा केली. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी १.२५ लाख बँकेच्या शाखांपैकी प्रत्येक शाखेने प्रत्येक क्षेत्रात किमान एक आदिवासी अथवा दलित आणि महिलांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मोदींनी यावेळी केले.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य असा महाराष्ट्राचा नाव लौकिक आहे. अनेक उद्योगपतींनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पसंती देऊन येथे उद्योगाचा विस्तार केला आहे. व्यापार आणि शिक्षणाच्या क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. रोजगारनिर्मिती आणि स्टार्ट अप यांना पर्याय नाही, हे ओळखून राज्याने स्टार्ट अप औद्योगिक धोरण जाहीर केले.

नव्या धोरणानुसार पुढील पाच वर्षांत तरुणांच्या नव संकल्पनांना चालना देण्यासाठी स्टार्ट अप ही योजना सुरु करण्यात आली. पूर्वीची उत्पादनं क्षेत्रे आता बदलली असून, नवी क्षेत्रे उदयाला येत आहेत. हे लक्षात घेऊन जैवतंत्रज्ञान, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स, माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रातील नवसंकल्पनांना खतपाणी घातले जाणार आहे. सध्या तरुणांमध्ये तांत्रिकदृष्ट्या कुशल व्यक्तींची संख्या वाढत असून, त्यांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या संकल्पनांना पाठबळ मिळावे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.


Next Story
Share it
Top
To Top