Republic Day | 'मेक इन इंडिया' अंतर्गत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सर्वाधिक पसंती

Republic Day | मेक इन इंडिया अंतर्गत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सर्वाधिक पसंती

मुंबई । देशात उद्योजकांच्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती केले जात आहे. महाराष्ट्रातील मुंबईव्यतिरीक्त पुणे हे राज्याचे स्टार्ट अप हब म्हणून पसंतीस उतरले आहे. महाराष्ट्रात जर्मनीपाठोपाठ चीनच्या अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. हायर इंडिया इंडस्ट्रीअल पार्कच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मिती बरोबरच विविध करांच्या रूपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. या पार्कच्या माध्यमातून भारत आणि चीनचे औद्योगिक संबंध अधिक घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

फडणवीस यांनी २०१५ साली चीन दौऱ्यावेळी हायर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार या पार्कची उभारणी करण्यात आली आहे. मेक इन महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्य शासनाने उचललेल्या सकारात्मक पावलामुळे हे शक्य झाली असल्याचे सांगितले आहे. हायर इंडीया इंडीस्ट्रीअल पार्क हा देशातील पहिला औद्योगिक पार्क आहे. या पार्कमुळे राज्यातील उद्योग जगतात सकारात्मक बदल होणार आहेत. या पार्कमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विविध करांच्या रुपाने महसूलातही मोठी वाढ होणार आहे. पुण्याबरोबर त्यांच्या आजूबाजूच्या या परिसरातील पायाभूत सुविधांमध्येही अमुलाग्र बदल होईल.

मेक इन इंडियामुळे महाराष्ट्र अभियानामुळे गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राला गुंतवणुकदारांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. याला अनुकूल उद्योजक धोरण, कुशल मनुष्यबळ कारणीभूत आहे. राज्यात इंग्लंड, जपान, अमेरीका, जर्मनी, नेदनलॅण्ड या देशातील उद्योजकांची मोठी गुंतवणुक केली आहे. पुणे हे देशातील आठवे मोठे महानगर झाले असून उत्पादनात पुण्याचा सहावा क्रमांक लागतो. पुणे हे देशाचे स्टार्ट अप हब आहे. गुंतवणुकदारांची पुण्याला सर्वाधिक पसंतीस उतलेले शहर आहे.

पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ॲटोमोबाईल कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे. त्याच बरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने फुड क्लस्टर म्हणूनही पुणे विकसित होत आहे. भाजी पाला व फळांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग या निमित्ताने येथे उभे राहणार आहेत. राजीव गांधी आयटी पार्कच्या माध्यमातून अनेक सॉफ्टवेअर,हार्डवेअर कंपन्याही पुणे परिसरात कार्यरत आहेत. इंडो-जर्मनी करारामुळे पुणे परिसरात दोन हजाराहून अधिक जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. आता चीनच्याही अनेक कंपन्या या परिसरात येत आहेत. या पार्कच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळेल.


Next Story
Share it
Top
To Top