HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | या शिवमंदिरात फडकवला जातो तिरंगा

भारत हा मंदिरांचा देश आहे, असे म्हटले जाते. येथे हजारो मंदिरे आहेत तसेच त्यांची वास्तुरचना, इतिहास, पूजा नियम, स्थाने ही वेगवेगळी आहेत. मात्र देवाच्या भक्तीबरोबरच देशाच्या स्वातंत्र्याचा मानही जेथे राखला जातो, असे एकमेव मंदिर आहे ते रांचीमधील पहाडी शिवमंदिर.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रत्येक स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनाला मंदिराच्या ध्वजाबरोबरच तिरंगा फडकविला जातो. या मंदिराची कहाणी मोठी रोचक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात यावर ब्रिटिशांचा ताबा होता व येथे ब्रिटिश, स्वातंत्र्यसैनिकांना फाशी देत असत. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या स्वातंत्र्यदिनाला येथे भारताचा तिरंगा फडकावला गेला. रांचीत फडकलेला हा पहिला तिरंगा होता.

स्वातंत्र्यसैनिक कृष्णचंद्र दास यांनी तो फडकावला होता व शहिदांची आठवण व त्यांना सन्मान देण्यासाठी नंतर प्रतिवर्षी येथे ध्वजारोहण केले जाऊ लागले. येथे एक शिला आहे त्यावर १४ व १५ ऑगस्ट १९४७ चा मध्यरात्रीचा स्वातंत्र्याचा संदेश कोरला आहे.

रेल्वे स्टेशनपासून ७ किमी वर असलेल्या या मंदिराचे जुने नांव होते टिरीबुरू. ब्रिटिश आल्यानंतर त्यांचे नांव पडले फांसी गरी. कारण येथे स्वातंत्र्यसैनिकांना फासावर लटकविले जात होते. समुद्रसपाटीपासून २१४० फूट व जमिनीपासून ३५० फूट उंचीच्या लहानशा टेकडीवर हे शिवमंदिर आहे. ४६८ पायर्‍या चढून महादेवाचे दर्शन घेता येते. मंदिराच्या टेकडीवर चढून गेल्यानंतर संपूर्ण रांचीचे मनोहारी दर्शन घडते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर नवज्योतसिंह सिद्धूंची वर्णी !

News Desk

राज्यात ४६६ नवे ‘कोरोना’बाधित, तर एकट्या मुंबईत ३०८

News Desk

लव्ह मॅरेज केलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून

News Desk