HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | मुंबईत रंगणार नौका नयन स्पर्धा

मुंबई | यंदा भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन आहे. संपूर्ण देशात २६ जानेवारी म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा केला जातो. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारताने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. जगभरात हाच दिवस कस्टम डे म्हणून देखील साजरा केला जातो. मुंबईत या दिवशी एक नौका नयनाची स्पर्धा होते. यावेळी देश-विदेशात तयार केलेल्या नौकांचा वापर केला जातो.

मुंबईत यंदाही कस्टम कप रेगाटा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारीला दुपारी २ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून ही स्पर्धा सुरु होईल. नौदल आणि यॉट क्लब यात सहभाग घेतील. कॉर्पस ऑफ मिलिटरी इंजिनिअर्स, आर्मी यॉटिंग सेंन्टर, नेव्हल सेलिंग क्लब, इंजियन कस्टम आणि रॉयल बॉम्बे यॉट यांचा देखील या स्पर्धेत सहभाग असतो. दि बॉम्बे कस्टम यॉट क्लबकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा एकूण ६० नौका या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी

News Desk

गोव्यात आजपासून सुरू होणार बारावीची परीक्षा

News Desk

रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधी कारवाया थांबवा, मुफ्तींची मागणी

News Desk