HW News Marathi
मनोरंजन

Vijay Diwas : पाकिस्तानचा पराभव आणि भारताच्या विजयाची 10 कारणे

भारत पाकिस्तानच्या युद्धात १९७१ साली पाकिस्तानला अकस्मित पराभवाचा सामना करावा लागला. या युद्धामुळे पुर्व पाकिस्तान स्वतंत्र झाले आणि एक नवीन देश म्हणून बांग्लादेशची निर्मिती झाली. करगिल युद्धात मुख्य भूमिका बजावणा-या सेवानिवृत्त कर्नल बी.बी. वत्स यांनी सांगितलेली भारताच्या विजयामागची आणि पाकिस्तानच्या पराभवाची ही १० मोठी कारणे. १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने आत्मसमर्पण केले होते.

१. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली तेव्हा भारताचे नेतृत्व मजबूत होते. त्यावेळी पाकिस्तानामध्ये हुकूमशहा याहया खान हे निर्णय घेण्यासाठी सक्षम नव्हता.

२. भारतात त्यावेळी राजकीय कूटनीति, नोकरशाही आणि लष्करी सह समन्वय अधिक चांगले होते. दुसरीकडे पाकिस्तानी सैनिकी राजवटीमुळे, सर्वत्र विखुरलेले होते.

३. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने युद्धापुर्वी रशियाशी सामंजस्य करार केला होता. तर दुसरीकडे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास पाकिस्तानला अपेक्षा होती अमेरीका आणि चीन आपल्याला मदत करेल पण सत्य परिस्थितीत तसे झाले नाही.

४. पाकिस्तानच्या मदतीसाठी अमेरिकेने हिंद महासागरात डिएगो गार्सिया पर्यंत सातव्या क्रमांकाची फ्लीट बेडा पाठविली परंतु रशियाबरोबर भारताने केलेल्या करारामुळे रशियाने भारताला मदतीसाठी आण्विक पाणबुडी पाठविली. ही भारताची उजवी बाजू ठरली.

५. पूर्व पाकिस्तानमध्ये युद्ध वेगाने केल्यामुळे भारताने तीन दिवसांत वायुसेना आणि नेव्हल विंगचा पराभव केला. यामुळे, पूर्व पाकिस्तानच्या राजधानी ढाकामध्ये पॅराट्रोपर्स सहजपणे उतरले, जे 48 तासांनी जनरल ए.के. नियाझी यांच्या लक्षात आले.

६.पाकिस्तानमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार केवळ उच्च स्तरावर केंद्रीकृत होते. यामुळे मुख्य अधिका-यांनी घेतलेले निर्णय सामान्य सैनिकांपर्यंत पोहचण्यास विलंब होत असे. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर कोणताही निर्णय वेगात घेऊ शकत नव्हते. भारतातील लष्कर प्रमुख मानेकशॉ यांनी निर्णय घेण्याचे अधिकार दोन मुख्य कमांडरना दिले होते. त्या भारतीय सेना निर्णय घेऊन आक्रमक हल्ला करु शकली.

७. पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानमध्ये ‘क्रॅक डाउन’ सुरू केले होते. या कारणाने, पूर्व पाकिस्तानमधील सैन्याने लोकांवर दडपशाही, मारहाण आणि अत्याचार करणे सुरू केले. यामुळे सैन्याच्या नियमांचा भंग झाला. अशा परिस्थितीत, जेव्हा त्यांना भारतासारख्या एका शिस्तबद्ध लष्कराचा सामना करवा लागल्याने पराभूत होऊन समर्पण करावे लागले.

८. अखेरपर्यंत पाकिस्तानला भारताची धोरणे ठाऊक नव्हती. त्यांनी विचार केला की भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानमधील नद्या ओलांडल्या नाहीत आणि ढाकापर्यंत पोहचू शकणार नाहीत आणि सीमाबंदीशी संलग्न राहतील ही त्यांची चूक होती. भारतीय सैन्याने पॅराट्रोपर्सच्या मदतीने ढाकाला घेरले. त्याचवेळी मुक्ति वाहिनीच्या मदतीने सीमेवरील भारतीय सेना पूर्व पाकिस्तानच्या सीमेपासून पाकिस्तानमध्ये घुसली.

९.पाकिस्तानच्या आर्मी, नेव्ही आणि वायुसेनामध्ये समन्वय नव्हता. याच कारणामुळे तीन जण संयुक्तपणे कारवाई करीत नव्हते. तर दुसरीकडे भारतीय लष्कराच्या फील्ड मार्शल मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखालील तीनही विंग एकत्रित काम करत असल्यामुळे हे युद्ध यशस्वीपणे जिंकता आले.

१०.पूर्व पाकिस्तान मधील मुक्ती वाहिनीच्या स्वरूपात तयार केलेली सेना पाकिस्तानी सैन्याबरोबर लढली आणि भारतीय सैन्याला मार्ग या सेनेने सांगितले. याच कारणामुळे पूर्व पाकिस्तानच्या नद्या ओलांडून भारतीय सेना ढाकापर्यंत पोहचू शकली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शो मॅन राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांचे निधन

swarit

पारशी धर्मियांचे नववर्ष !

News Desk

नो पॉलिटिक्स हिअर…जस्ट लाईफ !

News Desk