HW News Marathi
मनोरंजन

चॉकलेट गिफ्टवाली दिवाळी

सध्याच्या कॉर्पोरेट युगात प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत ही काळानरुप बदलत चालली आहे. आपली नोकरी, व्य़वसाय या सर्वांचा ताळमेळ राखत आत्ताचे सण साजरे केले जात आहेत. काही दिवसांवर येवून ठेपलेल्या दिवाळी वर ही ह्याचा प्रभाव जाणवतो आहे. दिवाळीत आपल्या प्रियजनांना भेटवस्तू, गिफ्ट मोठय़ा प्रमाणात दिले जातात. त्यात ही गिफ्ट संस्कृती येण्यापूर्वी घरी तयार केलेले दिवाळीच्या फराळाचे पदार्थ शेजारी व नातेवाईकांना देण्याची परंपरा होती. ती आता काहीशी थंडावली आहे. त्यामुळे मिठाई, चॉकलेट देण्याच्या गिफ्टचे प्रमाण वाढत आहे.

आधी वाढदिवसाचे औचित्य साधून चॉकलेट्सची मागणी व्हायची. मात्र आता प्रत्येक सणावारात चॉकलेटला मागणी आहे. मिठाईपेक्षा चॉकलेटच्या पदार्थांना टिकाऊपणामुळे मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. दिवाळीसाठीच्या गिफ्ट आयडियाजमध्ये सध्या चॉकलेटचे स्थान मिठाईच्या वरचढ आहे. आपल्या बजेटचा ताळमेळ राखत मिठाईला पर्य़ाय म्हणुन चॉकलेट देणे हेच सर्वोत्तम आणि लोकप्रिय आहे.

यंदाच्या दिवाळीतील चॉकलेट गिफ्टचे प्रकार-

दिवाळीच्या भेटवस्तूंमध्ये चॉकलेट बॉक्सचा नंबर हल्ली अव्वल असतो. दिसायला छान, सगळ्यांना आवडणारे आणि टिकणारे असे चॉकलेट म्हणूनच द्यायला सोयीचे आहे.काहीतरी हटके भेट देण्याच्या हेतूने‘स्पेशल’व्यक्तीसाठी चॉकलेट बुके ही सध्या बाजारात आहेत. तसेच डार्क, मिल्क, व्हाईट, कॅरेमल हे चॉकलेटचे विविध फ्लेवर दुकानांत, मॉलमध्ये उपलब्ध आहेत. घरी बनवल्या जाणाऱ्या चॉकलेट्सनाही जास्त मागणी आहे. कारण आपल्याला हवी तशी, हव्या त्या आकारात, पॅकिंगमघ्ये ती बनवून मिळत आहेत.

कुठे कराल खरेदी-

मुंबईत कुर्ला, मस्जिद बंदर, दादर या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये हे चॉकलेट गिफ्ट तुम्हाला कमी दरात मिळु शकतात. अगदी ५० रुपयांपासून ह्या चॉकलेट गिफ्टची सुरूवात आहे. न परवडणाऱ्यासांठी किंवा काही तरी हटके करणाऱ्यासांठी विविध आकारातील बॅग, बॉक्स, विविध आकारातील परड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ज्यात आपण आपल्याला ह्व्या त्या पद्धतीने सजावट करुन चॉकलेट गिफ्ट देता येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आचार्य अत्रे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

News Desk

सनी लिओनीचा ‘नाद खुळा’, खरेदी केली सव्वा कोटीची कार

News Desk

पं. तुळशीदास बोरकर यांचे निधन

News Desk