HW News Marathi
राजकारण

दिवाळीच्या निमित्ताने साठ्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

मुंबई | वर्षभरातील सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात आनंददायी सण असतो. पण खरा आनंद हा इतरांना आनंद देण्यात असतो. या विचाराने साठ्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण साजरा केला. साठ्ये महाविद्यालयाच्या ३८ विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. आपण ज्या समाजातील मूलभूत सुविधांपासूनही वंचित राहिलेल्या काही लोकांसाठी या विद्यार्थ्यांनी एक नवीन उपक्रम राबवला आहे. माहिम पश्चिम येथे असलेल्या फूटपाथवर राहणाऱ्या लोकांकडे जाऊन घरचा फराळ तसेच वायफळ खर्च टाळून पैसे साठवून घेतलेल्या चटयांचे वाटप केले आहे.

सामाजिक भावना जपत साठ्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साजरी केलेली ही दिवाळी नक्कीच कौतुकास्पद आहेत. अशाच उपक्रमांमधून देशाच्या तरुण पिढीचा विचार समाजापुढे येतो. देशाच्या तरुण पिढीला आपल्या समाजाच्या स्थितीची संपूर्ण जाणीव आहेच आणि चांगल्या दृष्टीने बदल घडवून आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत हे देखील यातून दिसून येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या राम मंदिराच्या सुनावणीची तारीख जानेवारीतच निश्चित होणार !

News Desk

राज्यसभेत निलंबित झालेल्या रजनी पाटील यांच्याकडे काँग्रेसने सोपवली ‘ही’ जबाबदारी

Aprna

राहुल गांधी आज अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार

News Desk