HW News Marathi
संपादकीय

आशियाचा नोबेल ‘मॅगसेसे पुरस्कार’

पूनम कुलकर्णी | आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अॅवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांचे १९५७ मध्ये एका विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. दर वर्षी ३१ ऑगस्ट रोजी राजधानी मनिलामध्ये हे पुरस्कार दिले जातात.

फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील रॉकफेल भावंडांनी केली. या पुरस्काराचे स्वरुप प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे आहे. विषेश म्हणजे या पुरस्काराचे मानकरी भारतात देखील आहेत.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये कम्युनिस्ट बंडखोरांशी शांतता चर्चा करणारे फिलिपाईन्स नागरिक, अपंगाबाबत होणा-या भेदभावाविरुद्ध लढणा-या पोलियोग्रस्त व्हिएतनामी नागरिकाचाही समावेश आहे. हा पुरस्कार दरवर्षी गेल्या ६० वर्षांपासून दिला जातो.

मॅगसेसे पुरस्कारचे यंदाचे भारतीय मानकरी कोण ?

आशियातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणा-या ‘द रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराची घोषणा हल्लीच करण्यात आली. यंदाच्या विजेत्यांमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. या आधी देखील अनेकदा भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या पुरस्कारामध्ये मानसिक रुग्णांवर उपचार करणारे डॉ.भारत वटवानी आणि शिक्षण क्षेत्रात अनोखे काम करणारे सोनम वांगचुक या दोघांची या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

रस्त्यावर भीक मागणाऱ्या हजारो मानसिक रुग्णांवर उपचार करुन त्यांची काळजी घेणा-या आणि उपचारानंतर रुग्णांना त्यांच्या कुटुंबियांना भेटवणारे डॉ. भरत वटवानी यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. तर पर्यावरण, संस्कृती आणि शिक्षण यांच्या माध्यमातून मुलांच्या प्रगतीसाठी काम करणारे सोनम वांगचुक यांचा देखील यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर मोदींना चढावी लागेल मातोश्रीची पायरी ?

swarit

निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व मुस्लिम समाजातील कुप्रथा ?

News Desk

कॉंग्रेस निरुपम यांना घरचा रस्ता दाखवणार का ?

swarit