मनमोहन सिंग जगातील सर्वात उच्चशिक्षित पंतप्रधान

मनमोहन सिंग जगातील सर्वात उच्चशिक्षित पंतप्रधान

देशाला अर्थिक उदारीकरणाच्या वाटेवर यशस्वीपणे नेणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस. जगभरातील पंतप्रधान झालेल्या नेत्यांपैकी सर्वात उच्चशिक्षित पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख आहे.

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवार २६ सप्टेंबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षात पदार्पण केले. सन २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालखंडात मनमोहन सिंग यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. युपीए सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र, मनमोहनसिंग यांची प्रतिमा आजही प्रामाणिक, पारदर्शी आणि दूरदृष्टीचा नेता अशीच आहे. आज वयाच्या ८६ व्या वर्षी देखील ते सक्रीय राजकारणात उत्साहाने सहभागी आहेत. युपीए सरकारमध्ये पंतप्रधान असतानाही ते सहज आणि साधेपणानेच राहत. डॉ. मनमोनहसिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ साली पंजाबमध्ये जन्म झाला.

असा आहे डॉ.मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ

१९५७ ते १९६५ दरम्यान भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग चंदीगडमधील पंजाब विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी पदभार सांभाळला.दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात मानद प्राध्यापक होते.भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.

१९९० - ९१ ला भारतीय प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिल्यानंतरनवनिर्वाचित पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रालयाची धुरा सोपवली. १९९१ ला त्यांनी नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री पदावर काम केले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बँक यांच्या विकासात मनमोहन सिंग यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. भारताचे १४ वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळताना मनमोहन सिंग यांनी अर्थकारणाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

मनमोहन सिंग हे जगातील पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या नेत्यांपैकी सर्वात उच्चशिक्षित

मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहनसिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली होती.

१९९१ सालापर्यंत डॉ. मनमोहन सिंग यांनी राजकारणात प्रवेश केला नव्हता. परंतु त्यावेळी नवनिर्वाचित पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थमंत्रालयाची धुरा सोपवली. मनमोहन सिंग यांच्याच काळात भारताने जागतिकीकरणाची धोरणे अवलंबली.

जगातील १४ नामांकीत विद्यापीठांनी मनमोहन सिंग यांना डी.लिट ही मानद पदवी देऊन गौरविले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठात शिकविण्यास सुरुवात केली.


Next Story
Share it
Top
To Top