मुंबई | बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास बाकी असताना बाजारापेठेत भक्तांची एकच गर्दी गेली. बाप्पाच्या मखर, फुले, कंदील, रांगोळी, शाल-उपरणं अशा विविध वस्तुनीं बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. परंतु बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी सुगंधी अगरबत्तीचे विशेष महत्त्व आहे.या सुगंधाने दरवळलेल्या बाजारपेठा ग्राहकांना मोहित करत आहेत.
ग्राहक आवर्जुन या विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्तीला ग्राहकांची पसंदी मिळत आहे. मोगरा, चंदन, गुलाबस, कस्तुरी आणि साई फ्लोरा अशा विविध प्रकारच्या अगरबत्ती बाजारात उपलब्ध आहेत. या अगरबत्तीची किंमत २० रुपयापासून ते १००० रुपयापर्यंत अशी त्यांची किंमत आहे. अगरबत्तीबरोबरच बाजारपेठत धूप खरेदी देखील आवडीने ग्राहक खरेदी करत आहेत. तसेच ग्रीन, ब्लू, रेड आणि पर्पल असे धूपचे स्टिक बाजारात उपलब्ध आहेत.