Anant Chaturdashi | विसर्जन मिरवणुकीत महापौरांना धक्काबुक्की

Anant Chaturdashi | विसर्जन मिरवणुकीत महापौरांना धक्काबुक्की

कोल्हापूर | गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरच्या महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की झाली आहे. कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीचे पुजन महासूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोंद्रे या देखील विसर्जन मिरवणुकीला उपस्थित होत्या. पाटील यांच्या बॉडीगार्ड आणि पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप महापौर बोंद्रे यांनी केला आहे.

पूजन झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. तेव्हाच पाटील यांच्या बॉडीगार्ड आणि पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप महापौर बेंद्रे यांनी केला आहे. या प्रकरणानंतर बेंद्रे यांनी संताप व्यक्त करत. या पुढे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची प्रतिक्रिया महापौर बोंद्रे यांनी दिली. या घटनेनंतर विसर्जन मिरवणुकीत थोड्या वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीला कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ढोल वाजवून ताल थरला होता. तसेच राज्यभरात विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीवर बंदी असल्यामुळे पारंपरिक वाद्ये लेझिम, ढोल-ताशा गजराता बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्याकडे भाविकांचा कल दिसला.


Next Story
Share it
Top
To Top