मुंबई । गणेशोत्सव मंडपासमोरुन मोटारसायकल हळू चालविण्यास सांगणा-याला बेदम मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी धारावीतील हिंदु सोनापूर रोडवर घडली आहे. विनोद गणेश देवेंद्र (२९) असे या मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणात नागेश कोंडम व शशी शेरखाने या दोन्ही आरोपींना धारावी पोलिसांनी अटक केले आहे.
विनोद देवेंद्र हा धारावीतील एका हॉटेलमध्ये स्वयंपाक्याचे काम करायचा तो त्याच्या भाऊ सुरेशसोबत शुक्रवारी सायंकाळी गणपती व देखावे पहाण्यासाठी गेला होता. कामराज युथ असोसिएशनच्या सार्वजिनक मंडळाजवळून जात असताना दोघांनी मोटारसायकवरुन भरधाव वेगाने जात होते. तेव्हा विनोदने त्याला हळू जाण्यास सांगितले.
त्यामुळे दोघे जण चिडले त्यांनी विनोदला पकडून लाथा-बुक्यांनी मारहाण केली. गुप्तांगावर मार बसल्याने देवेंद्र जागीच कोसळला. यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरुन पलायन केले. विनोदला बेशुद्धावस्थेत पाहिल्यानंतर लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा विनोद देवेंद्रचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मिळालेल्या वर्णावरुन दोन्ही आरोपींचा शोध घेत नागेश व शशीला अटक करण्यात आले.