मुंबई | ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. आणि हा रविवार बाप्पाच्या आगमनासाठी शेवटचा रविवार आहे. त्यामुळे मोठंमोठ्या गणेश मंडळांनी बाप्पाला मंडपात विराजमान करण्यासाठी कार्यशाळेमधून बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे.
मुंबईतील नामांकित गणपतींपैकी एक असलेल्या चिंचपोकळी चिंतामणीची आज दिमाखदार आगमन सोहळ्याची दणक्यात सुरूवात झाली आहे. यंदा चिंचपोकळीच्या चिंतामणीचे ९९ वे वर्ष आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनासाठी पुण्यातील कलेश्वरनाथ ढोल ताशा पथकाने सलामी दिली. सुप्रसिद्ध मूर्तिकार खातू यांच्या करी रोड येथील कार्यशाळेतून चिंतामणीची आगमन सोहळ्याची स्वारी निघाली आहे. निघालेल्या चिंतामणीचे फोटो काढण्यासाठी हजारो तरुण व तरुणी एकवटले आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनीही रस्ताच्या दुर्तफा गर्दी केली आहे.
आज शेवटचा रविवार असल्यामुळे चिंचपोकळीच्या चिंतामणी सह, अंधेरी पश्चिम येथील विश्वाचा महाराजा, खेतवाडीचा राजा, परळचा राजा, उमरखाडीचा राजा, सुतार गल्लीचा राजा, चिराबाजारचा महाराजा, भोईवड्याचा महाराजा, फोर्टचा चिंतामणी, खेतवाडीचा महाराजा, खारचा लाडका, बोरिवलीचा विघनहर्ता, अश्या अनेक मंडळाच्या बाप्पाच्या आगमनाने लालबाग-परळचा परिसर बाप्पाच्या मिरवणुकांमुळे गजबजून गेला आहे.